esakal | #SaathChal कापडी पिशव्यांचे वारकऱ्यांना वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

सासवड (ता. पुरंदर) - तनिष्का सदस्यांनी शिवलेल्या कापडी पिशव्यांचे वारकऱ्यांना वाटप करताना बाबामहाराज सातारकर. शेजारी तनिष्का सदस्या व इतर.

#SaathChal कापडी पिशव्यांचे वारकऱ्यांना वाटप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गराडे - ‘प्लॅस्टिकबंदीच्या पार्श्‍वभूमीवर ‘तनिष्का व्यासपीठा’च्या माध्यमातून कापडी पिशव्यांचे केले जाणारे वाटप हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या माध्यमातून प्लॅस्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृती केली जात आहे, त्याला सर्व स्तरांतून साथ द्यायला हवी. स्वतः प्लॅस्टिक वापरणार नाही आणि इतरांना वापरू देणार नाही, ही कृतीच आता पर्यावरण प्रदूषण रोखू शकते, असे विचार ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले. 

सासवड (ता. पुरंदर) येथून मंगळवारी संत सोपानदेव महाराज पालखीने आषाढीवारीसाठी प्रस्थान ठेवले. या वेळी सोपानदेव मंदिराजवळ तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून तसेच पुरंदर रोटरी क्‍लबच्या सहकार्याने पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक संजय जगताप यांच्या हस्ते वारकऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

नीरा बाजार समिती आवारात पुरंदर रोटरी क्‍लबचे अध्यक्ष प्रवीण जगताप यांच्या हस्ते, तर पुरंदर हायस्कूल येथे बाबामहाराज सातारकर यांच्या हस्ते सुमारे २ हजार कापडी पिशव्या वाटण्यात आल्या. 

या वेळी रोटरी क्‍लबचे सदस्य अभिजित जगताप, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी उपनगराध्यक्ष सुहास जगताप, अनिल उरवणे, प्राचार्य एच. ए. मुजावर, माजी प्राचार्य अरुण सुळगेकर, प्रा. केशव काकडे, रविन जगदाळे, पुंडलिक सायनेकर, इस्माईल सय्यद आदी उपस्थित होते. 

तनिष्का सदस्या कुमुदिनी पांढरे, नीता सुभागडे, प्रिया पावसे, सुषमा भिसे, सुमन शिरवळकर, विद्या जगताप यांनी इतर महिलांच्या सहकार्याने या कापडी पिशव्या तयार केल्या.

loading image