बेगमपूर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
BEG26B01871
बेगमपूर (ता. मोहोळ) : येथे सचिन जाधव यांचा सत्कार करताना मुस्लिम समाजबांधव.
---
रमजानचे उपवास संयम,
त्यागाची शिकवण देतात
सचिन जाधव; बेगमपुरात इफ्तार पार्टी
सकाळ वृत्तसेवा
बेगमपूर, ता. ३ : पवित्र रमजान महिन्यातील उपवास संयम व त्यागाचा संदेश देतात. प्रत्येकाने धार्मिक शिकवणीचे तत्त्व आचरणात आणल्यास सामाजिक शांती व सलोखा वाढण्यास नक्कीच मदत होऊ शकेल, असे मत जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांनी बेगमपूर (ता. मोहोळ) येथे व्यक्त केले.
येथील शाही मस्जिदमध्ये साहिल तांबोळी मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जाधव यांच्या हस्ते उपस्थित बांधवांना फळांचे वाटप करण्यात आले. सचिन जाधव यांची जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संयोजक साहिल तांबोळी, नदीम तांडेल, माणिक तांबोळी, अमूलाल तांबोळी, मौलाना आसिफ पठाण, लतीफ शेख, अब्दुल रहेमान शेख, पांडुरंग सरवळे, उदय कावळे, महिबूब तांबोळी, संतोष भोई, अल्ताफ तांबोळी, सरदार तांबोळी, मोहसीन पठाण, सरफराज तांडेल आरिफ पठाण आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

