विंग. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी सचिन पाचपुते यांची निवड

विंग. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी सचिन पाचपुते यांची निवड
Published on

भाजप जिल्हा सरचिटणीसपदी
सचिन पाचुपते यांची निवड

विंग, ता. १२ ः येथील माजी उपसरपंच सचिन पाचुपते यांची भाजपच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली. भाजपच्या कऱ्हाड तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते ही निवड झाली. या निवडीबद्दल कार्यकर्ते, ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
आमदार डाॅ. अतुल भोसले यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली. डाॅ. भोसलेंच्या नेतृत्वात विंगसह तालुक्याच्या भाजपच्या संघटनात्मक कामात ते सक्रिय आहेत. पक्षनिष्ठा, मेहनत अणि जनसंपर्कामुळे त्यांनी कार्यकर्त्यांत वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॅा. भोसलेंच्या नेतृत्वात विभागात विविध विकासकामांत त्यांचे योगदान मोलाचे आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे, आमदार डाॅ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, डॉ. सुरेश भोसले, मदनराव मोहिते, धनाजी पाटील, कृष्णा उद्योग समूहातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

B02229
सचिन पाचुपते

---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com