अंबानींच्या बंगल्याबाहेरील कारची पुण्याच्या टीमकडून तपासणी

Sachin Waze case forensic team pune visits nias mumbai office Mansukh hiren Ambani Car
Sachin Waze case forensic team pune visits nias mumbai office Mansukh hiren Ambani Car

पुणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या एसयूवी कारमध्ये स्फोटकं सापडल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. कारमध्ये प्रमुख्याने जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. ही कार बेपत्ता असल्याची तक्रार करणारे कार मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळं प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आता ताब्यात घेण्यात आलेल्या कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. यासाठी पुणे फॉरेन्सिक टीमचं एक पथक पुण्याहून मुंबईला रवाना झालं आहे. या प्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे. पुण्याहून रवाना झालेली ही टीम एनआयएला तपासात मदत करणार आहे. कारची संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी करण्याची जबाबदारी या टीमवर असणार आहे. 

तरीही पुण्याच्या टीम 
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून दोन कारमधून फॉरेन्सिक एक्सपर्ट मुंबईला रवाना झाले आहेत. या अधिकाऱ्यांची मुंबई भेट ही केवळ अंबानी यांच्या बंगल्याबाहेरील कारची तपासणी करण्यासाठी झाल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमधील कर्मचाऱ्यांनी स्कॉर्पिओची आणि त्यात सापडलेल्या स्फोटकांची तपासणी केली आहे. कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर व्हिसेरा तपासणीचं कामही या लॅबकडेच आहे. त्यानंतरही पुण्यातील फॉरेन्सिक एक्सपर्टकडे कारच्या तपासाचे काम सोपविण्यात आल्याची माहिती आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंबानी यांच्या बंगल्याबाहेर 25 फेब्रुवारी रोजी संशयास्पद कार सापडली होती. तर, हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंबईच्या खाडीत सापडला होता. या प्रकरणात एनआयएने स्कॉर्पिओसह इनोव्हा, दोन मर्सिडिज आणि एक टोयोटा लँड क्रूझर प्रॅडो अशा पाच गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एकेकाळचे एन्काउंट स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्यावर संशयाची सूई असून, एनआयएकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मनसूख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमागे सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com