
पुण्यातील सदाशिव पेठेत ड्रंक अँड ड्राइव्हची घटना घडली असून यात १३ जणांना कारनं उडवलंय. कार चालकानं या घटनेत चहाच्या टपरीवर थांबलेल्यांना अक्षरश: फरफटत नेलं. सायंकाळी पाच वाजता घडलेल्या या घटनेत १३ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांचा समावेश आहे. कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, जिल्हा धाराशिव) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.