लाईनमन दिनानिमित्त समाधान डुरे यांचा सत्कार
VRG26B06267
बार्शी : येथे उत्कृष्ट लाइनमन म्हणून समाधान डुरे यांचा सत्कार करताना महावितरणचे अधिकारी व उपस्थित मान्यवर.
---
लाइनमन दिनानिमित्त समाधान डुरे यांचा सत्कार
वैराग : गतवर्षी अतिवृष्टी व महापूर आला होता. त्यामध्ये इर्लेवाडी गावाचा वीजपुरवठा खंडित झाला होता; जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यात जाऊन विद्युतपुरवठा सुरळीत केला. कर्तव्यात कसूर न करता उत्कृष्ट काम केले, म्हणून महावितरणच्या सुर्डी शाखेच्या वतीने बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी समाधान डुरे यांचा उत्कृष्ट कामगार म्हणून सन्मान करण्यात आला.
महावितरणच्या वतीने लाइनमन दिनानिमित्त महावितरणमधील प्रकाशदूत म्हणून अनेक कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल बार्शी उपविभागीय कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता राकेश मगर, उपकार्यकारी अभियंता विनोद घोलप, उपकार्यकारी अभियंता बार्शी ग्रामीण रामदास डोंगरे, उपकार्यकारी अभियंता धनंजय भारती, अभियंता अनुपम ओहोळ, लाइनमन गणेश चोरघडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

