

पुणे, ता. १२ ः कोरेगाव पार्क परिसरातील साधू वासवानी पूल प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करा. संबंधित काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यास प्राधान्य द्या, असे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मंगळवारी दिले.
कॅंटोन्मेंट परिसर व कोरेगाव पार्क परिसराला जोडणाऱ्या साधू वासवानी पुलाचे काम काही वर्षांपासून सुरू आहे. विविध तांत्रिक कारणांमुळे संबंधित कामाला मोठ्या प्रमाणात विलंब झाला आहे. त्यावरून महापालिका व पोलिस प्रशासनामध्ये खटके उडाले होते. दरम्यान, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मंगळवारी पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत कामाचा आढावा घेतला. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेकडून साधू वासवानी चौकातील रेल्वे मार्गावर सुमारे ५४ मीटर लांबीचा ‘ओपन वेब गर्डर रेल्वे स्पॅन’ टाकण्यात येणार आहे. हा प्रकल्पातील महत्त्वाचा आणि आव्हानात्मक भाग आहे. या मार्गावर दररोज २४० हून अधिक रेल्वेगाड्यांची वाहतूक होत असल्याने सुरक्षिततेची काळजी घेत कामाचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली. तसेच, पुलाच्या कामात अडथळा ठरणारी एक मीटर व्यासाची जुनी ओव्हरहेड जलवाहिनी स्थलांतरित करून भूमिगत केल्याची माहितीही देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.