Minor Girls Missing
sakal
पुणे - शहरात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. १ ते १५ फेब्रुवारी या पंधरवड्यात तब्बल २० मुलींच्या अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. या मुलींचे वय प्रामुख्याने १३ ते १७ वर्षांदरम्यान आहे. सोशल मीडियावरील ओळखी, प्रेमाचे आमिष, लग्नाचे आश्वासन आणि ओळखीच्या व्यक्तींचा सहभाग ही या घटनांमागील प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे.