khadakwasla dam
sakal
खडकवासला - वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आणि धरणांच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेच्या दृष्टीने खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, गुंजवणी, वीर, देवघर आणि भाटघर या आठ धरणांच्या सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) येत्या वर्षभरात या धरणांचे तांत्रिक मूल्यांकन करून संरचनात्मक स्थिती व सुरक्षिततेचा अहवाल जलसंपदा विभाग आणि राज्य शासनाकडे सादर करणार आहे.