वाई:-प्रा.संभाजी लावंड यांच्या "सहज संवाद "पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
प्रा. संभाजी लावंड यांच्या
‘सहज संवाद’चे प्रकाशन
वाई, ता. ५ : येथील प्रा. संभाजी लावंड यांनी निर्मला देवी माताजींनी स्थापित केलेल्या सहजयोगावर लिहिलेल्या ‘सहज संवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कवी स्वाभिमानी सरकार वाचन मंदिर (इंगळी) आयोजित २७ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात हा कार्यक्रम झाला. संमेलनाध्यक्ष प्रा. राजेंद्र सुंदरदास फंड यांच्या अध्यक्षतेखाली व कादंबरीकार डॉ. श्रीकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा मराठी भाषा अधिकारी डाॅ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी राज्यस्तरीय कविसंमेलनाचे अध्यक्ष लेखक कवी घनशामदास अंदानी, विविध कवी व कवयित्री उपस्थित होते. दीपक पवार यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. प्रा. लावंड यांनी यापूर्वी गुराखी, वलाफोक हे दोन ग्रामीण कथासंग्रह लिहिले आहेत. ‘सहज चैतन्य जागर’ या नवीन पुस्तकाचे लेखनही सुरू आहे. यावेळी डॉ. बलदेव निकम व त्यांचे कुटुंबीय, प्रा. सरस्वती वाशिवले व ज्येष्ठ कवी सुभाष कळशे उपस्थित होते.
------
B07653
सातारा : ''सहज संवाद'' पुस्तकाचे प्रकाशन करताना डाॅ. शिवाजी शिंदे, प्रा. संभाजी लावंड, प्रा. राजेंद्र सुंदरदास फंड, डॉ. श्रीकांत पाटील व मान्यवर.
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

