

PNE26W60402
सोलापूर : निवडणूक निकालानंतर विजयी मुद्रा दाखविताना उमेदवार व पॅनेलचे मार्गदर्शक.
सहकार परिवार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व
समर्थ सहकारी बँक निवडणूक : बँक सुरू झाल्यावरच संचालक स्वीकारणार सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : समर्थ सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सहकार परिवार पॅनेलचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. समर्थ बँकेवर सहकार परिवार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. या बँकेच्या १२ संचालकपदांसाठी एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. १२९९ पैकी १२५९ मते वैध ठरली. ४० मते अवैध ठरली. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच सहकार परिवार पॅनेलच्या उमेदवारांनी आणि समर्थकांनी सारस्वत मंगल कार्यालय येथे जल्लोष केला.
त्यानंतर सर्व उमेदवार डफरीन चौकातील ब्राह्मण समाजसेवा संघाच्या आदर्श मंगल कार्यालयात असलेल्या सहकार परिवार पॅनेलच्या कार्यालयात एकत्र आले. तेथे सर्व विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष केला. फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आली. निकालानंतर पॅनेलप्रमुख राम तडवळकर आणि राकेश टोळे यांनी मार्गदर्शन केले. सहकार परिवार पॅनेलचा विजय झाला असला, तरी आता आम्ही कोणत्याही विजयी उमेदवाराचा सत्कार करणार नाही. ज्या दिवशी समर्थ बँक सुरू होईल, त्यानंतर सर्व संचालक सत्कार स्वीकारतील, असे त्यांनी सांगितले.
चौकट...
विजयी उमेदवार
सहकार परिवार पॅनेलचे निवडून आलेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे (सर्वसाधारण गट) : ओमप्रकाश सिंग (११५४), दिव्यांशू सिंग (११४०), राहुल सिंग (१२३८), स्वरूप चौधरी (११३८), प्रशांत बागेवाडीकर (१०९३), किरण करकमकर (१०९२), अमित कामतकर (१०८६), मुरलीधर खाडिलकर (१०७६), दिलीप दुलंगे (१०५३), युवराज माने (१०४८). समर्थ बँक बचाव पॅनेलच्या उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणे : श्रीधर गोखले (१११), अनिरुद्ध देशपांडे (९९), चंद्रकांत रेम्बसु (९९), मिलिंद नंदुरकर (९५), संजय झळकीकर (९४). महिला प्रतिनिधी मतदारसंघातून सहकार परिवार पॅनेलचे निवडून आलेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : मालती सिंग (१११०), सुजाता इनामदार (१०८८). तर समर्थ बँक बचाव पॅनेलच्या उमेदवार उमा झळकीकर यांना ११७ मते मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.