पारनेर -सायकल भेट

पारनेर -सायकल भेट
Published on

SPU26B06389
धोत्रे ः साहिल कोळेकर यास सायकल भेट दिल्याप्रसंगी महेश डाळिंबकर, शिक्षक सचिन ठाणगे, नंदा चेमटे व विद्यार्थी.

साहिलची तीन किलोमीटरची पायपीट थांबणार
महेश डाळिंबकर यांचा उपक्रम ः सोशल मीडियावरील व्हिडिओने वाचा फोडली

पारनेर, ता. ७ : धोत्रे खुर्द (ता. पारनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब विद्यार्थी दररोज तीन किलोमीटरचा पायी प्रवास करत शाळेत येत होता. मात्र, त्याचे वास्तव सोशल मीडियावरील व्हिडिओतून समोर आले. या संवेदनशील बाबीची दखल घेत कायझेन स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक महेश डाळिंबकर यांनी त्या विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यास सायकल भेट दिली. यामुळे होतकरू व गरीब साहिल धनंजय कोळेकरच्या शिक्षणाची वाट सुकर झाली.
सायकलमुळे त्याच्या शिक्षणाला गती मिळाली. धोत्रे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे काही विद्यार्थी दूर अंतरावरून दररोज पायी शाळेत येतात. शिक्षणाची प्रबळ इच्छा असूनही प्रवासासाठी त्यांना साधन नसल्याने त्यांना हे अंतर पायीच कापावे लागते. या विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे लक्ष या प्रश्‍नाकडे वेधले गेले. या घटनेची दखल घेत सामाजिक बांधिलकी जपत डाळिंबकर यांनी साहिलला सायकल भेट दिली. या मदतीमुळे साहिलचा दररोजचा शाळेचा प्रवास सुकर झाला आहे.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळा दूर करण्यासाठी पुढे आलेल्या डाळिंबकर यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्याला दिलेली सायकल केवळ प्रवासाचे साधन नसून त्याच्या शिक्षणाच्या स्वप्नांना दिलेली नवी गती असल्याची भावना शिक्षक सचिन ठाणगे व नंदा चेमटे यांनी व्यक्त केली.
या उपक्रमाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी तेजस्विनी पवार, केंद्र प्रमुख सुहास खरमाळे, ग्रामस्थ व पालकांनी डाळिंबकर यांचे आभार मानले.
-----------
शिक्षणासाठी एवढ्या लांब अंतरावरून पायी येणाऱ्या साहिलचा संघर्ष पाहून मन हेलावले. प्रवासाच्या अडचणीमुळे त्याच्या शिक्षणात खंड पडू नये, हीच भावना मनात होती. म्हणून त्याला सायकल देऊन छोटासा हातभार लावण्याचा प्रयत्न केला.
-महेश डाळिंबकर, संचालक, कायझेन, अकॅडमी स्पर्धा परीक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com