
तळेगाव ढमढेरे : धानोरे (ता. शिरूर) येथील साहिल सुनील शेळके याने वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया’ यांच्या वतीने मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेत ३७० गुण मिळवून यश मिळविले. त्याने ग्रुप एकमध्ये २०० गुण व ग्रुप दोनमध्ये १७० गुण मिळविले आहेत.