आळे येथील महाविद्यालयात जैवविविधता कार्यशाळा

आळे येथील महाविद्यालयात जैवविविधता कार्यशाळा

Published on

आळेफाटा, ता. १९ : आळे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जैवविविधतेविषयी एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस प्रमुख व्याख्याते म्हणून पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक उपस्थित होते.
कुचिक यांनी सह्याद्री पर्वतरांग येथील समृद्ध जैवविविधतेविषयी माहिती दिली. त्यांनी परिसरात आढळणारे विविध पक्षी, फुलपाखरे, वन्य जीव तसेच दुर्मिळ वनस्पती यांची माहिती चलचित्रांच्या माध्यमातून सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी वन्यजीव अभ्यास व संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील जैवविविधतेची माहिती करून देत तिचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यशाळेस ओतूर, जुन्नर व नारायणगाव येथील महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संतोष राठोड, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरुण गुळवे, बबन कुऱ्हाडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष राठोड यांनी तर आभार प्रा. गोपीनाथ श्रीरामे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com