सह्याद्री फार्मसीचे एनएसएस विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

सह्याद्री फार्मसीचे एनएसएस विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

Published on

SGW26B09390
मेडशिंगी (ता‌. सांगोला) : येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी.

सह्याद्री फार्मसीचे एनएसएस
श्रमसंस्कार शिबिर उत्साहात
........
सांगोला, ता. १ : मेथवडे (ता. सांगोला) येथील सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत मेडशिंगी येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात पार पडले. जनजागृती रॅली, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण व परिसर स्वच्छता अशा विविध उपक्रमांमुळे नागरिक, पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्‍घाटन डॉ. पूनम बाबर (वैद्यकीय अधिकारी, पीएचसी मेडशिंगी), उमा प्रतापसिंह इंगवले (सरपंच, ग्रामपंचायत मेडशिंगी), पूनम सुदर्शन इंगवले (पंचायत समिती सदस्य), अमर गोडसे (माजी सरपंच), प्रभाकर कसबे (माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष), सतीश राऊत (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी), डॉ. विजय इंगवले, डॉ. प्रमोद जाधव, संतोष इंगवले (पोलिस पाटील), संस्थेच्या अध्यक्षा अनिता इंगवले व आशा वर्कर्स यांच्या उपस्थितीत झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्‍घाटनानंतर संपूर्ण मेडशिंगी गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यानंतर आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात नागरिक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. एस. पी. जोकार, प्रा. ए. व्ही. सपाटे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व मेडशिंगीचे कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com