
जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर आता, या १२ किल्ल्यांची ज्योतिर्लिंग यात्रे प्रमाणे ‘शिवतिर्थ यात्रा’ राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे सुरू करण्यात यावी, आणि या यात्रेचा शुभारंभ शिवनेरी किल्ल्यावरून सांस्कृतिक आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हावा अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.