मसूर : सह्याद्री सहकारी कारखाना पत्रकार परिषद

मसूर : सह्याद्री सहकारी कारखाना पत्रकार परिषद
Published on

‘सह्याद्री’च्या विस्तारवाढ प्रकल्पास प्रारंभ

बाळासाहेब पाटील; प्रतिदिन ११ हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक गाळपाचे उद्दिष्ट

मसूर, ता. ३० : सह्याद्री साखर कारखान्याचा नवीन विस्तारवाढ प्रकल्प सर्व समस्यांवर मात करत अखेर कार्यान्वित झाला. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या आणि ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी दूरदृष्टीतून पाहिलेले दहा हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्टाचे स्वप्न आता साकार झाले आहे. या नवीन प्रकल्पामुळे प्रतिदिन ११ हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक गाळप क्षमतेचे उद्दिष्ट आता साध्य होणार आहे, असे सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, संपूर्ण ऊस गाळपाबरोबरच तोडणीच्या तथाकथित तक्रारींना पायबंद बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करून ते म्हणाले, ‘‘सह्याद्री कारखान्याची स्थापना १९७० मध्ये झाली. सह्याद्रीचे संस्थापक (कै.) पी. डी. पाटील यांनी दूरदृष्टीतून भविष्यात दहा हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, सह्याद्री कारखाना हा शेतीपाण्याने स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी हणबरवाडी-धनगरवाडी योजनेचा पाया (कै.) पाटील यांनीच रचला. त्याच्या मंजुरीसाठी त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, (कै.) अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे आदींचे सहकार्य मिळाले.
सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रातील वाढत्या ऊस उत्पादनामुळे विस्तारवाढ प्रकल्पाची गरज ओळखून वाटचाल सुरू करताना अनेक अडचणी आल्या. सहकारमंत्री असताना सर्व कागदपत्रांची रीतसर पूर्तता करून मंत्रिमंडळासमोर मंजुरी घेतली. त्या दरम्यान युक्रेन युद्धामुळे स्टीलमध्ये दरवाढ झाल्याने तूर्तास हा प्रकल्प लांबणीवर गेला. हा नवीन प्रकल्प सुरू असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यात विस्तारवाढ शेडबरोबरच सह्याद्रीचे प्रचंड नुकसान झाले. पुन्हा काही तांत्रिक बाबीमु‌ळे विस्तार वाढीतील दीडशे मेट्रिक टनाचा बॉयलरचा टेक्निकल बाबी पूर्ण करण्यासाठी काही अवधी गेला. त्यामुळे या ना त्या कारणाने हा प्रकल्प लांबणीवर गेला.
मात्र, आता पूर्ण क्षमतेने त्यास यश आले असून, १६ जानेवारीला त्याची यशस्वी चाचणी घेतली. त्याची टप्प्याटप्प्याने क्षमता वाढवून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.
यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल पाटील, संचालक जशराज पाटील, संचालक, कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे, प्रकाश सोनवणे, आर. जी. तांबे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
..............

B02473
बाळासाहेब पाटील
........................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com