
जुनी सांगवी : सत्कर्म करत डोळस श्रद्धा असावी, भेदांच्या भिंतींना थारा नसावा.मनामनात प्रेम व सत्कार्याची संतांची शिकवण समाजाच्या प्रगतीला पुरक राहिली आहे. समाधान ही मनाची अवस्था आहे. भौतिक गोष्टीत समाधान नसल्याने सत्कर्म करून समाधान मिळवले पाहिजे.हि संतांची शिकवण आहे.असे जुनी सांगवी येथे फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन आयोजित संयुक्त जयंती महोत्सवाच्या दुस-या दिवशीच्या सत्रात दिनकर शास्त्री भुकेले महाराज यांनी ' संत परंपरा ' या विषयावर प्रबोधन केले.