पुणे - ‘नवी आव्हाने सातत्याने येत राहणार आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी एकजुटीने काम करत राहा. वाचकांना आणि जाहिरातदारांना काय हवे आहे, त्यांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल, याचा विचार करा,’ असा मौलिक सल्ला सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी बुधवारी दिला.