esakal | ‘सकाळ दिवाळी पहाट’मध्ये रंगणार शब्दसुरांची मेजवानी
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali-Pahat
  • २७ ऑक्‍टोबर - बेगम परवीन सुलताना 
  • २८ ऑक्‍टोबर -  राहुल देशपांडे
  • कधी - पहाटे ५.३० पासून 
  • कोठे - पंडित फार्म्स, डीपी रोड, कर्वेनगर  
  • प्रवेश - मोफत पास लवकरच

‘सकाळ दिवाळी पहाट’मध्ये रंगणार शब्दसुरांची मेजवानी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परवीन सुलताना यांची २७ रोजी, तर राहुल देशपांडे यांची २८ रोजी मैफल
पुणे - पुणेकरांसाठी रविवार  (ता. २७) पासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून शब्द-सुरांच्या सुरेख मैफलीचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात गाण्यांचा सुरेल नजराणा मिळणार आहे. बेगम परवीन सुलताना आणि राहुल देशपांडे यांच्या सुरेल स्वरांनी ही दिवाळी पहाट सजणार आहे.

पहाटेच्या प्रसन्नवेळी या सूर-तालांनी पुणेकरांची दिवाळी पहाट अजून प्रसन्न होईल. पहाटे साडेपाचला हा कार्यक्रम सुरू होईल.  नरकचतुर्दशीच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. २७) बेगम परवीन सुलताना यांच्या बहारदार गायनाने रसिकांची पहाट स्मरणीय होईल. सोमवारी (ता. २८) राहुल देशपांडे यांच्या स्वरांनी पाडवा पहाट रंगणार आहे.

बेगम परवीन सुलताना या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील स्वरसाम्राज्ञी. मेलडीक्वीन परवीन सुलताना म्हटले की ‘हमे तुमसे प्यार कितना’ हे कुदरतमधील गाणे रसिकांना आठवतेच. त्याचबरोबर ‘कौन गली गयो श्‍याम’ (पाकिजा), ‘ए मुहबत यूं ही तू बदनाम नहीं’ (आशय) अशी अनेक लोकप्रिय गाणी त्यांच्या नावावर आहेत. राहुल देशपांडे यांनी सुरू केलेला ‘वसंतोत्सव’ हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव आहे. त्यांनी संगीत मानापमान या संगीत नाटकाचे पुनरुज्जीवन केले. 

या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी. लि., पावर्ड बाय पल्लोड असून, रिअल इस्टेट पार्टनर श्री राम बिल्डर व निर्माण प्रमोटर्स आहेत. त्याचबरोबर सहप्रायोजक श्री रामकृष्ण ऑइल मिलचे लाकडी घाणा, चितळे डेअरी, वास्तू रविराज आहेत.

कार्यक्रमाचे एज्युकेशन पार्टनर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ट्रॅव्हल पार्टनर किया हॉलिडेज व बेव्हरेज पार्टनर जीएस चहा हे आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. मोफत पास मिळण्याची तारीख व ठिकाणे लवकरच जाहीर केली जातील.

loading image