Sakal Drawing Competition 2026 : रंगरेषांच्या दुनियेत हरवले विद्यार्थी; घोडेगावात सकाळ चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Ghodegaon Ambegaon Taluka : घोडेगाव येथे झालेल्या सकाळ चित्रकला स्पर्धा 2026 मध्ये विद्यार्थ्यांनी रंगरेषांच्या दुनियेत आपली कल्पनाशक्ती मुक्तपणे मांडली. सुमारे 450 विद्यार्थ्यांच्या सहभागाने कला, उत्साह आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
Students Immerse in Colors at Sakal Drawing Competition 2026

Students Immerse in Colors at Sakal Drawing Competition 2026

Sakal

Updated on

घोडेगाव : बसस्थानक व रस्सीखेच , गणपती विसर्जन, घरातील परसबाग, , माझी खोली, रांगोळी या सारखी चित्र रेखाटण्यात बालचमू दंग झाले. निमित्त होते चार पिढ्यांचा साक्षीदार असलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेचे. दरवर्षी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यां सोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेला आंबेगाव तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. घोडेगाव येथील केंद्रावर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहिला. पेन, पेन्सिल, रंगीत खडू, जलरंग व इतर रंग साहित्यचा वापर करीत विद्यार्थांनी चित्र रेखाटले. दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग महाराष्ट्र व गोवा राज्यातील केंद्रावर असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com