Ambegaon News : उन्हाळ्याची तीव्रता अन् वन्यजीवांचे हाल; वृत्ताची दखल घेत प्रशासनाची धाव.

'सकाळ'च्या वृत्ताची दखल घेत वनविभागाने आंबेगाव तालुक्यातील रांजणी आणि वळती येथील कोरड्या पडलेल्या तीन पाणवठ्यांमध्ये तातडीने पाणी सोडले आहे.
Impact of 'Sakal' News: Forest Department Fills Dry Waterholes in Ambegaon

Impact of 'Sakal' News: Forest Department Fills Dry Waterholes in Ambegaon

Sakal

Updated on

निरगुडसर: आंबेगाव तालुक्यातील रांजणी,वळती या दोन गावातील वनविभागाच्या हद्दीत असलेले जंगलातील तीन पाणवठे कोरडे पडल्याचे वृत्त दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध होताच वनविभागाकडून तातडीने कोरड्या पडलेल्या तीनही पाणवठ्यात पाणी सोडले आहे,यामुळे पशू पक्षांची तहान भागणार आहे. वळती (ता.आंबेगाव) येथील वनपरिमंडळात असलेल्या रांजणी,वळती,भागडी या तीन गावांच्या वनविभागाच्या हद्दीत पाच पाणवठे वनविभागाकडून उभारण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com