Sakal Karandak One-Act Play Competition
sakal
पुणे - भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स यांच्या ‘लाजाळू’ या एकांकिकेने ‘सकाळ करंडक’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीचे विजेतेपद पटकावले. यासह या एकांकिकेची पुणे विभागातून स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स. प. महाविद्यालयाच्या ‘ईमान’ या एकांकिकेने; तर सांघिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गणेशखिंड या संघाच्या ‘नातीगोती’ या एकांकिकेने पटकावले. विशेष सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘स्कीम’ या एकांकिकेने पटकावले.