

Booker Prize-winning author Banu Mushtaq will inaugurate Sakal Lit Fest 2026 in Pune on November 12.
esakal
पुणे : आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक विजेत्या ज्येष्ठ कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांच्या हस्ते ‘सकाळ लिट फेस्ट २०२६’चे उद्घाटन येत्या गुरुवारी (ता. १२) सकाळी ११ वाजता होणार आहे. फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे या वेळी उपस्थित राहतील. विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा होईल.