

Sakal Lit Fest Pune 2026 Sessions and Guest Speakers
esakal
पुणे : सकाळ लिट फेस्टमध्ये शनिवारी (ता. १४) माजी न्यायमूर्ती एस. मुरलीधर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा, प्रसिद्ध लेखक अक्षत गुप्ता यांची सत्रे होणार आहेत.
एस. मुरलीधर यांच्या संविधानावरील सत्राने शनिवारी सुरुवात होईल. त्यानंतर ‘द हिडन हिंदू’ मालिकेचे लेखक अक्षत गुप्ता प्राचीन भारतीय ग्रंथांमधील ज्ञानमोती आणि त्यांतून उत्कंठावर्धक थरारकथा कशा जन्माला येतात, याचा उलगडा करतील. त्यानंतर लगेचच राज ठाकरे हे राजकारणी म्हणून नव्हे, तर व्यंग्यचित्रकार म्हणून बोलणार आहेत!