
Sakal Maha Conclave LIVE: केंद्र सरकारचं ethanol संदर्भातील धोरण अतिशय चांगलं - शरद पवार
‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने शुक्रवारपासून (ता. १७) पुण्यात दुसऱ्या सहकार महापरिषदेचे (सकाळ महाकॉन्क्लेव्ह) आयोजन करण्यात आले आहे. या दोनदिवसीय महापरिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. तर, समारोपप्रसंगी शनिवारी (ता. १८) केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक -
केंद्र सरकारचं ethanol संदर्भातील धोरण अतिशय चांगलं - शरद पवार
सहकारी साखर कारखाने यामधून राज्य सहकारी संघ स्थापन केला यामुळे एक मोठं व्यासपीठ मिळाले आहे.आत्तापर्यंत देशात ऊस आणि साखर याच्यापुढे गेलो नाही पण आता जायचे असेल तर सहकारी संस्थांनी लक्ष दिले पाहिजे.महाराष्ट्रात १००० लाख टन ऊस गळला जातो. सध्या २४७० मेगा व्हॉट विजेचे प्रकल्प सुरू झाले आहेत.राज्य सरकारला मी विजेचे दर कमी करण्याबाबत सांगतो आहे. केंद्र सरकारचं ethanol संदर्भातील धोरण अतिशय चांगलं आहे.
महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेश मधील काही कारखाने सुधारले आहेत. ऊसाचा दर्जा किती चांगला होईल यावर त्यांनी लक्ष दिले आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा व्यवसाय मोठा झाला. यात अनेक लोकांनी आत्तापर्यंत अनेक कष्ट केले आहेत.आज राहणीमान, शिक्षणात अनेक बदल झाले आहेत असेच बदल साखर कारखाने यांना द्यावा लागेल, असं शरद पवार म्हणाले.
यंदा देशात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखर तयार केली आहे - शरद पवार
"बँकेच्या बैठकीला जायचे म्हणजे पूर्वी घरून दशम्या घेऊन जायचं असं होतं. यशवंतराव चव्हाण यांनी गाव पातळीवर दूध, सहकारी बँक, जिल्हा बँक याचे जाळ उभारले आणि त्याला राज्य सरकारकडून कशी मदत मिळेल हे काम केले.आज साखर निर्यात दाराची प्रगती होत आहे. हा व्यायवसाय वाढला पाहिजे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या शाखा वाढल्या पाहिजेत".
"कारखानदारी जिथे राहील तिथे त्यांना टेक्निकल सपोर्ट मिळेल अशी जागा आम्ही निवडली. साखर धंद्याला वेगळी दिशा मिळाली आणि याचे जाळं वाढावं. खानदेशात सुद्धा आज कारखाने आहेत तिथे देखील अशी एक शाखा काढावी. यंदा देशात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशपेक्षा जास्त साखर तयार केली आहे. शेतकऱ्यांना उसाची किंमत द्यायची होती त्यात देखील ज्यादा अदा केली आहे. गेल्या २ दशकात काही साखर कारखाने अडचणीत आले, असंही शरद पवार पुढे म्हणाले".
महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ ही खाजगी लोकांनी रोवली - शरद पवार
शरद पवारांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना पवार म्हणाले, "ग्रामीण महाराष्ट्रासाठी ही महत्वाची परिषद आहे. साखर कारखानदारी आणि सहकार यांच्या प्रश्नांची चर्चा होणार आणि त्याला देशाचे सहकार मंत्री येणार आहेत. देशाच्या सहकार क्षेत्राची सूत्रे त्यांनी हाती घेतल्यानंतर मी स्वतः त्यांना भेटायला गेलो आणि सत्कार करून महाराष्ट्राच्या प्रश्नांची मांडणी केली. आणि सांगायला आनंद आहे की त्यांनी बहुतेक प्रश्नांची सोडवणूक केली गेली. त्यामुळे या परिषदेत जे प्रश्न मांडले जातील त्या साठी अनुकूल प्रश्न मांडला जाईल याची मला खात्री आहे."
पवार पुढे म्हणाले, मी उत्तर प्रदेशात बंद पडलेले कारखाने बघायला गेलो होतो. तिथे ऊस पीक घ्यायला सुरुवात झाली होती. या उद्योगाला सुरुवात झाली ती १९३२ साली. सरकारने परदेशातून येणाऱ्या साखरेवर duty बसवली आणि मग इथे कारखाने काढायला प्रोत्साहन मिळायला लागलं. वालचंद हिराचंद हे कापडाचे व्यापारी. त्यांची इच्छा होती साखर धंद्यामध्ये जावं. आज ज्याला वालचंदनगर म्हणतात तिथे कळंब नावाचं गाव होतं. तिथं साखर कारखाना काढायचा धाडसी निर्णय घेतला. महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ ही खाजगी लोकांनी केली.