

PNE26W62453
सोलापूर : ‘सकाळ मॅरेथॉन’बाबत दैनिक सकाळच्या कार्यालयात संवाद साधण्यासाठी आलेले वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सोमेश्वर याबाजी, सोमनाथ चौधरी, राहुल बिराजदार, अविनाश हत्तरगी, सिद्धेश्वर हत्तरगी, अमित कलशेट्टी, विजयकुमार बिराजदार, गंगाधर झुरळे व संजय साखरे.
---
‘सकाळ मॅरेथॉन’मुळेच लागली फिटनेसची सवय!
वीरशैव व्हिजनच्या सदस्यांचे अनुभव; नियमित चालणे, धावणे अन् मैदानांचे महत्त्व अधोरेखित
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : कोरोनानंतर थांबलेला व्यायाम, वाढलेला स्थूलपणा आणि मोबाईलमध्ये गुंतलेली दिनचर्या... यातून बाहेर पडण्यासाठी ‘सकाळ मॅरेथॉन’ अनेकांसाठी निमित्त ठरली. गेल्या वर्षी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मैदानावर आलेल्यांची पावले आता नियमित चालणे आणि धावण्याकडे वळली आहेत. काहींना शारीरिक त्रासातून आराम मिळाला, तर काहींनी रोज चालण्याचा सराव सुरू केला. मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून शहराच्या फिटनेसच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, अशी भावना वीरशैव व्हिजनच्या सदस्यांनी व्यक्त केली.
फिटनेससोबतच मुलांचा मैदानावरील वावर, संतुलित आहार आणि शहरात अधिक मैदाने असण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
---
कोट
कोरोनानंतर व्यायाम व फिरणे बंद झाल्याने स्थूलपणा आला होता. परंतु, ‘सकाळ मॅरेथॉन’मुळे पुन्हा मैदानावर फिरणे, व्यायाम सुरू झाले आहे. सकाळ मॅरेथॉन म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याबाबत सजगता नाही, तर ती संपूर्ण शहराच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम आहे.
- राजशेखर बुरकुले
---
कोट
फिरणे हा आयुष्याचा अविभाज्य भाग असलाच पाहिजे. ‘सकाळ मॅरेथॉन’निमित्ताने आम्हीही ही संधी साधली आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना ही मॅरेथॉन प्रेरणादायी आहे. दैनिक सकाळने आयोजनात सातत्य ठेवून शहरवासीयांच्या शारीरिक संपत्तीचे रक्षण करावे, त्याला शहरवासीयांनीही साथ द्यावी.
- सोमेश्वर याबाजी
---
दैनिक सकाळच्या मॅरेथॉनमुळे गेल्या वर्षापासून मैदानात धावण्याची सवय लागली. शरीरस्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी ही मॅरेथॉन निमित्त ठरली आहे. हा उपक्रम असाच सुरू ठेवावा.
- अमित कलशेट्टी
---
कोट
बंद झालेले फिरणे ‘सकाळ मॅरेथॉन’च्या निमित्ताने पुन्हा सुरू झाले. फिटनेस ही प्रत्येकाची गरज आहे. फिरणे, धावणे केवळ शरीर नीट ठेवत नाही, तर अनावश्यक विचारांपासूनही दूर ठेवते. हे शहराच्या आरोग्य चळवळीचे दुसरे यशस्वी पाऊल आहे.
- सिद्धेश्वर हत्तरगी
---
कोट
काही काळापूर्वी शरीराला त्रास होता. फिरायला लागल्यापासून तो खूपच कमी झाला. मॅरेथॉननिमित्त गेल्या वर्षांपासून नियमित व्यायाम व रनिंगची सवय लागली. प्रत्येकाने स्वतःसाठी किमान एक तास द्यावा.
- सोमनाथ चौधरी
---
कोट
अनेक शाळांना मैदाने नसल्याने मुलांना मैदानाची माहितीच होत नाही. जुळे सोलापूर आणि होटगी रोडवर मैदाने झाली तर पुन्हा सुदृढ पिढी तयार होईल. त्याचा पाया म्हणजे ‘सकाळ मॅरेथॉन’. या मॅरेथॉनमुळे माझे फिरणे, धावणे पुन्हा सुरू झाले.
- अविनाश हत्तरगी
---
कोट
‘कराग्रे वसते लक्ष्मी...’च्या जागी आता कराग्रे वसते मोबाईल... अशी स्थिती आहे. मन, मेंदू, शरीर बळकट करण्यासाठी मैदानात धावणे गरजेचे आहे. व्यायाम, वाचन, धावणे या उपक्रमांचे मोहिमेत रूपांतर व्हावे. मुला-मुलींना मैदानात व्यायाम व धावण्यासाठी प्रेरणा द्यावी.
- राहुल बिराजदार
---
कोट
सातत्याने धावले तरच फिटनेस राहतो. केवळ धावणे नाही, तर सकस व संतुलित आहारही महत्त्वाचा आहे. मैदानावर जाण्याच्या सवयीने गेल्या वर्षी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो. यंदाही सहभागी झालो आहे.
- गंगाधर झुरळे
---
कोट
मागील वर्षी ‘सकाळ मॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने मैदानावर फिरण्यास सुरुवात केली. ती सवय जोपासल्याने यंदाही मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होत आहे. सध्या रोज सकाळ-संध्याकाळ तीन किलोमीटर चालण्याचा सराव आहे. यामुळे थकवा येत नाही.
- विजयकुमार बिराजदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.