जणू भरलं "तनिष्कां'चं संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - एकाच रंगाच्या नऊवारी साड्या... त्यावर चढविलेला दागिन्यांचा साज... कुठे मैत्रिणींची होत असलेली गळाभेट, तर कुठे व्यक्त होणारी कृतज्ञता... सारं वातावरणच कुटुंबातल्या मंगल कार्यासारखं... वर्धापन दिनाचं औचित्य साधून "सकाळ'च्या प्रांगणात जणू तनिष्का सदस्यांचं संमेलनच भरलं होतं, त्यांच्या उत्साहानं सारा मंडप व्यापून गेला होता.

"सकाळ'च्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील भोर, चाकण, सासवड, इंदापूर, बारामती, मुळशी आदी विविध ठिकाणांहून तनिष्का सदस्या अगदी उत्साहाने आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी कुणी आपल्या गटासह, तर कुणी एकेकटे... कुणी स्वतंत्र गाड्या करून, तर कुणी स्वतःच्या दुचाकीवर सायंकाळी 5 वाजल्यापासूनच सकाळ कार्यालयात जमायला सुरवात केली. त्या केवळ आल्याच नाहीत, तर त्यांनी वर्धापन दिनानिमित्त विशेष पारंपरिक पेहराव करून "सकाळ'बरोबरचा आपला कौटुंबिक जिव्हाळा आणखी दृढ केला. 

"सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतानाच, तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती त्या देत होत्या, सोबतच इतर पाहुण्यांबरोबरही त्या व्यासपीठाच्या कार्यासंबंधी चर्चा करत होत्या. जिल्ह्यातून आलेल्या आपल्या मैत्रिणींची गळाभेट घेत, हास्यकल्लोळात त्यांच्यासोबत सेल्फी अन्‌ ग्रुप फोटो काढण्यासाठी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यांचा क्‍लिकक्‍लिकाट होत होता. 

Web Title: sakal-media-group-85th-anniversary tanishka group