

साताऱ्यात आजपासून ‘सकाळ नाट्य महोत्सव’
बहिणींना द्या दर्जेदार नाटकांची ‘भेट’; शाहू कलामंदिरात प्रयोग
सातारा, ता. २६ : मराठी रंगभूमीवरील दर्जेदार नाटकांची पर्वणी सातारा शहरातील रसिकांना पुन्हा अनुभवता यावी, यासाठी ‘सकाळ नाट्य महोत्सवा’चे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. उद्यापासून (शुक्रवार) रविवारपर्यंत (ता. ३०) येथील शाहू कलामंदिर येथे सायंकाळी सात वाजता तीन बहारदार नाटकांचे प्रयोग होणार आहेत. रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहिणींना ही अनोखी ‘भेट’ देण्याची संधी आहे.
या सांस्कृतिक महोत्सवाचे प्रायोजक म्हणून यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि सहप्रायोजक प्लॅनेट होम डेकोर, श्री मंगलमूर्ती क्लिनिक ॲण्ड रिसर्च सेंटर प्रा. लि. आणि सनलिमिटेड सोलर हे लाभले आहेत. या महोत्सवात ‘ही दोस्ती तुटायची नाय...’, ‘शिकायला गेलो एक!’, ‘वरवरचे वधू-वर’ या तीन लोकप्रिय नाटकांचा समावेश आहे. विनोद, नातेसंबंध, भावनिक गुंतागुंत आणि आधुनिक जीवनशैलीचे विविध पैलू या नाटकांमधून रसिकांसमोर उलगडणार आहेत.
‘शिकायला गेलो एक!’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचे आहे. यामध्ये प्रशांत दामले, ऋषिकेश शेलार आणि सुशील इनामदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘वरवरचे वधू-वर’चे लेखन व दिग्दर्शन विराजस कुलकर्णी यांनी केले आहे. यामध्ये सखी गोखले, सुव्रत जोशी आणि सूरज पारसनीस यांच्या भूमिका आहेत.
‘ही दोस्ती तुटायची नाय...’ या नाटकाचे लेखन ओंकार गोखले व दिग्दर्शन सूरज पारसनीस यांनी केले आहे. यामध्ये सुमीत राघवन, चिन्मयी सुमीत, शुभंकर एकबोटे आणि अमृता बने यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
.........................................
असा आहे नाट्य महोत्सव
शुक्रवार (ता. २८ ऑगस्ट) ः ‘ही दोस्ती तुटायची नाय...’
शनिवार (ता. २९ ऑगस्ट) ः ‘शिकायला गेलो एक’
रविवार (ता. ३० ऑगस्ट) ः ‘वरवरचे वधू-वर’
वेळ ः सायंकाळी सात वाजता
स्थळ ः शाहू कलामंदिर, सातारा
.........................................................
चौकट-
असे करा तिकीट बुकिंग
तीन दिवस चालणाऱ्या या नाट्य महोत्सवाची दैनंदिन तिकिटे उपलब्ध आहेत. तिकिटे Ticketalay आणि BookMyShow च्या संकेतस्थळावर, तसेच फोन बुकिंगद्वारे उपलब्ध आहेत. सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ शाहू कलामंदिरवरील तिकीट खिडकीवर ऑफलाइन उपलब्ध आहेत.
९४२२६ ०३००८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधूनही तिकिटे आरक्षित करता येतील. अधिक माहितीसाठी ९९२२९ १३३४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
.......................................................
आरोग्य सेवेबरोबरच समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीतही आपला सहभाग असावा, या भावनेतून मंगलमूर्ती हॉस्पिटलने ‘सकाळ नाट्य महोत्सवा’ला सहकार्य केले आहे. नाटक ही केवळ मनोरंजनाची कला नसून समाजाशी संवाद साधणारे प्रभावी माध्यम आहे. साताऱ्यात दर्जेदार नाट्य प्रयोगांना व्यासपीठ मिळावे आणि रसिकांना उत्तम कलाकृतींचा अनुभव घेता यावा, यासाठी या उपक्रमाचा भाग होताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
- सयाजी चव्हाण
संचालक, मंगलमूर्ती हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर
Media Id: PNE26W45297
.................................................
स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचा प्रसार करण्याबरोबरच समाजात सकारात्मक आणि विधायक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, ही S’Unlimited Solarची भूमिका आहे. साताऱ्यातील नाट्यरसिकांना दर्जेदार कलाकृतींचा आनंद मिळावा आणि स्थानिक सांस्कृतिक वातावरणाला अधिक बळ मिळावे, या उद्देशाने ‘सकाळ नाट्य महोत्सवा’शी जोडले जाताना आम्हाला आनंद होत आहे.
- आकाश शालगर, मानस शालगर
संचालक, सनलिमिटेड सोलर
Media Id: PNE26W45296
(आज छापलेल्या बातमीतील सर्व लोगो वापरणे)
...........................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.