

Massive Response to Sakal NIE Drawing Competition in Hadapsar–Manjari
Sakal
हडपसर : चित्रांचे विषय एकच मात्र कल्पनेची भरारी प्रत्येकाची वेगळी. ही कल्पना रंग रेषांच्या माध्यमातून चित्ररूपाने कागदावर रेखाटत परिसरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार उत्साहात सादर केला. सकाळ समूहाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी "सकाळ एन आय ई' चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने प्रमुख चार गटांतील परिसरातील ३ हजार २७५ चिमुकल्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.