Sakal Digital : ‘सकाळ डिजिटल’ला सुवर्ण पारितोषिक ‘वॅन-इफ्रा’कडून गौरव

WANIFRA Award : सकाळ प्लस या उपक्रमाला ‘वॅन-इफ्रा’चा जागतिक सुवर्ण पुरस्कार; दर्जेदार पत्रकारितेला वाचकांनी दिलेला आंतरराष्ट्रीय पाठिंबा!
WANIFRA Award
WANIFRA Award Sakal
Updated on: 

पुणे : दर्जेदार आणि निष्पक्ष वार्तांकनाच्या पाठीशी वाचक भक्कमपणे उभे राहतात, याची प्रचिती ‘वॅन - इफ्रा’च्या (WAN-IFRA) जागतिक पातळीवरील डिजिटल मीडिया पुरस्कारांमध्ये पुन्हा एकदा आली. ‘सकाळ प्लस’ या प्रीमियम कन्टेंटसाठीच्या उपक्रमास ‘वॅन-इफ्रा’चे सुवर्ण पारितोषिक मिळाले आहे. वाचकांच्या हिताचा, सखोल विश्‍लेषणात्मक आणि दर्जेदार पत्रकारितेसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल स्वीकारणारे ‘सकाळ’ हे मराठीतील पहिलाच माध्यम समूह आहे. वाचकांनीही या उपक्रमावर पसंतीची मोहोर उमटवल्याचेच ‘वॅन-इफ्रा’च्या या पुरस्कारातून प्रतिबिंबित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com