घरखरेदीसाठी पश्चिम पट्टा आकर्षक पर्याय

घरखरेदीसाठी पश्चिम पट्टा आकर्षक पर्याय
Published on: 

पिंपरी, ता. १३ : कार्यालयाजवळ घर, मुलांच्या शिक्षणाची सोय, जवळच बाजारपेठ आणि शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी रस्त्यांची जोड...घर खरेदी करताना विचारात घेतल्या जाणाऱ्या या गरजांसाठी पिंपरी-चिंचवडचा पश्चिम पट्टा आकर्षक पर्याय ठरत आहे. वाकड, ताथवडे, पुनावळे, हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, रावेत आणि किवळे परिसरात कुटुंबाच्या गरजेनुसार घर निवडण्यास वाव आहे. त्यासाठीच दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) ताथवडमध्ये ‘सकाळ प्रिमियम प्राॅपर्टी एक्स्पो’ आयोजित केला आहे.

हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानाची जवळीक हे या परिसराचे प्रमुख बलस्थान आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणाजवळ राहण्याचा पर्याय मिळतो. हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातून आयटी पार्कमधील विविध टप्प्यांकडे जाता येते. नेरे आणि जांबे येथेही घर निवडताना या रोजगारकेंद्राची जवळीक उपयुक्त ठरते. कार्यालय आणि घर एकाच पट्ट्यात असल्याने दैनंदिन प्रवासाचे नियोजन करणे सोयीचे होते.

वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसराला मुंबई-बंगळूर महामार्गाची जोड आहे. येथून हिंजवडी, बाणेर, बालेवाडी आणि पिंपरी-चिंचवडच्या विविध भागांत ये-जा करता येते. रावेत आणि किवळे येथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाकडे जाण्याची सोय असल्याने मुंबईकडे नियमित प्रवास करणाऱ्यांसाठीही हे भाग उपयुक्त ठरतात.

वाकड आणि आसपासच्या भागांतील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बाजारपेठा आणि बँकांमुळे दैनंदिन व्यवहारांची सोय होते. मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या आरोग्यसेवेसाठी आसपास पर्याय उपलब्ध असणे घरखरेदीसाठी महत्त्वाचे ठरते. विविध आकारांच्या सदनिकांमुळे कुटुंबाचा आकार आणि आर्थिक नियोजनानुसार घर निवडता येते. गृहसंकुलांतील खेळाची जागा, वाहनतळ, सुरक्षितता आणि विरंगुळ्याच्या सुविधा निवासाला पूरक ठरतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी जवळची दुकाने आणि आरोग्यसेवा, तर मुलांसाठी शाळा व खेळाच्या जागांची उपलब्धता घर निवडताना उपयोगी ठरते.

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामुळे या पट्ट्याच्या सार्वजनिक वाहतुकीला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानकांपर्यंत बस आणि रिक्षांची जोड मिळाल्यास रहिवाशांना प्रवासाचा आणखी पर्याय उपलब्ध होऊ शकेल. रोजगारकेंद्र, महामार्ग आणि दैनंदिन सुविधांची सांगड घालणारा हा परिसर स्वतःच्या घराचे स्वप्न साकारू इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी महत्त्वाचा पर्याय आहे.

काय असेल एक्स्पोमध्ये...
- विविध बांधकाम व्यावसायिकांच्या विविध प्रकल्पांची माहिती
- पंचवीसपेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या गृहप्रकल्पांची माहिती मिळणार
- टू बीएचकेपासून फोर बीएचकेपर्यंत सदनिका
- हिंजवडी आयटी पार्क आणि मुंबई-बंगळूर
- महामार्गाच्या परिसरातील घरे
- भविष्यातील निगडी-किवळे-ताथवडे-वाकड-भोसरी-चाकण मेट्रो मार्ग परिसरातील घरे
- नियोजित रिंगरोडपासून काही मिनिटांच्या अंतरावरील घरे

काय? कधी? केव्हा? कुठे?
- काय : सकाळ प्रिमियम प्रॉपर्टी एक्स्पो
- कधी : शनिवार (ता. १७) व रविवार (ता. १८)
- केव्हा : सकाळी ११ ते रात्री ८
- कुठे ः सिल्व्हर बँक्वेट हॉल, डांगे चौकापासून जवळ, औंध-रावेत बीआरटी रस्ता, रामनगर, ताथवडे
- अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१७१८८४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com