sri m with abhijit pawar
sakal
पुणे - ‘भक्तिमार्ग वाटतो तितका सोपा नाही. त्यासाठी निष्काम कर्मयोगाची आवश्यकता असते. नैसर्गिक पद्धतीने भक्तियोगाचे आचरण केल्यास कर्मयोगाची प्राप्ती होते’, असे मत आध्यात्मिक, योग गुरू श्री एम यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत ‘योग, उपनिषद आणि बियाँड’ या विषयावर ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी श्री एम यांच्याशी संवाद साधला.