पुणे - ‘प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्यासाठी प्रेरणा देणारा वक्ता असतो. पण स्वत: कोण आहोत, हे प्रत्येकाने जाणून घ्यायला हवे. आपण दुसऱ्यांना बोलतो, त्याआधी आपण ते स्वत:च्या जीवनात अमलात आणतो का, याचा विचार करायला हवा..कोणीही दुसरे येऊन तुम्हाला चोवीस तास प्रेरणा देणार नाही, तर तुम्हीच तुमचे प्रेरणास्थान आहात, हे लक्षात ठेवा. म्हणूनच आपले भावनिक आणि मानसिक कल्याण ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे,’ असा सल्ला प्रेरक आणि आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांनी दिला.‘सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यम्’ कार्यक्रमात किशोरी यांनी ‘एक प्रेरणादायी संवाद : भावनिक आणि मानसिक कल्याण’ विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘आपण मशिनप्रमाणे वागणे बंद करायला हवे. मशिनप्रमाणे आपल्याला गोष्टी, बदल हे पटापट व्हावे, असे वाटते. परंतु, निसर्ग चक्राप्रमाणे चालतो. आपले शरीर-मन हे निसर्गाशी जोडलेले आहे, हे समजून घ्या.’.स्वभाव वैशिष्ट्याबद्दल बोलताना किशोरी म्हणाल्या, ‘आपण सातत्याने दुसऱ्यावर टिपणी करतो. दुसऱ्यावर टिपणी करण्यापेक्षा एखादी व्यक्ती तुम्हाला दोन मिनिटे भेटली, तरी त्या व्यक्तीला ‘हा चांगला माणूस आहे’, असे वाटायला हवे, असा तुमचा स्वभाव घडवा.’पालकांना उद्देशून त्या म्हणाल्या, ‘आजच्या मुलांना समाज काय म्हणेल, याने फरक पडत नाही. तर पालक काय म्हणतील, याने त्यांना सर्वाधिक फरक पडतो. त्यामुळे मुलांना कायम प्रोत्साहन द्या.’ कार्यक्रमाच्या उत्तरार्धात किशोरी यांनी ‘‘मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैय्या मेरा नाम हो रहा है’ या भजनाच्या पंक्ती सादर गात उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली..जया किशोरी यांनी दिलेला सल्ला...जीवन आनंददायी घालविण्यासाठी कुटुंबाशी नाते अधिक दृढ करण्याला महत्त्व द्या.आपले आई-वडील हे एकमेव असे आहेत, की ज्यांना आपण त्यांच्यापेक्षा पुढे जावे, असे वाटते, हे समजून घ्या.आयुष्यात संघर्ष येणारच आहेत, हे मान्य करून परिस्थितीला सामोरे जा.सहज आनंदी जीवनासाठी नकारात्मकतेपासून दूर राहा. ....तरच चांगल्या गोष्टी आकर्षित होतील‘आपण दाखवतो तेवढं दु:ख आपल्या आयुष्यात नाही. एक नकारात्मक विचार शंभर नकारात्मक विचारांना आमंत्रण देत असतो. आपणच आपल्या नकारात्मक ताणाला ओढवून घेतो. तुम्ही चांगले असाल, तरच चांगल्या गोष्टींना आकर्षित करणार आहात. आपण स्वावलंबी राहण्याच्या गोष्टी करतो. परंतु, छोट्या-छोट्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून राहतो..आपल्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी होत आहेत. या चांगल्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला आणि सकारात्मक राहा. याची सातत्याने आठवण करून देणारे आणि आनंददायी जीवन कसे जगायचे हे सांगणारे ‘औषध’ (डोस) म्हणजे दरवर्षी होणारा ‘सकाळ स्वास्थ्यम्’ कार्यक्रम आहे,’ असेही जया किशोरी यांनी नमूद केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.