
पुणे - सध्याच्या स्पर्धात्मक काळात आपल्या जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात आपले ‘स्वास्थ्य’ निरोगी ठेवण्यासह स्वसंरक्षण, ध्वनी उपचारपद्धती (साउंड थेरपी), मार्शल आर्ट्स, योगसाधनेचे धडे आणि सेल्फ हिलिंगच्या विविध कला आत्मसात करण्याची संधी ‘सकाळ प्रस्तुत- सुहाना स्वास्थ्यम्’ अंतर्गत पुणेकरांना मिळत आहे.