टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी संवादात्मक कीर्तनातून स्वास्थ्याचा जागर केला. शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांच्या आरोग्याबाबत प्रबोधन केले. म्हणा, ‘राम कृष्ण हरी’, जगा आरोग्य निरोगी’, अशी पुणेकरांना साद घातली.