

फळे, पालेभाज्या, कडधान्ये, दुधाचे पदार्थ कमीत कमी प्रक्रिया करून जेवणात घ्यावेत. चांगल्या मनाने, भावनेने बनविलेले जेवण आनंदाने खाल्ल्यानंतर ते सात्त्विक ठरते. जेवण तयार करणाऱ्याचा एक भाव अन्नात उतरलेला असतो. त्यामुळे घरात बनवलेले जेवण जेवढे जास्त खाल तेवढे चांगले ठरते, असे प्रतिपादन प्रख्यात शेफ संजीव कपूर यांनी केले.