

पुणे : आयुष्याचा प्रवास स्वास्थ्यपूर्ण, सुखकर व आनंददायी करणाऱ्या आणि समग्र कल्याणाकडे वाटचाल करून सुदृढ समाजनिर्मितीसाठी शास्त्रीय मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ प्रस्तुत-सुहाना स्वास्थ्यम्’ या बहुचर्चित उपक्रमाचे तिसरे पर्व सहा ते आठ डिसेंबरदरम्यान पुण्यातील कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे होणार आहे.