sri m with abhijit pawar
sakal
पुणे - ‘शरीर गेल्यावरही जे आपल्यातून जात नाही आणि परब्रह्मापासून जे दूर नाही, ते म्हणजे अमृत. मृत्यूकडून अमृताकडे जाण्यासाठी गुरुकृपा आवश्यक आहेच. पण ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘अमृतानुभव’ हे ग्रंथ व्यवस्थित वाचल्यानंतर अमृताकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो,’ असे प्रतिपादन आध्यात्मिक योगगुरू श्री एम यांनी केले.