पुणे - अग्नीची उपासना करणारा ‘व्याहर्थी होम’ करत, गुरूंचे आशीर्वाद घेत चैतन्यमयी आणि आध्यात्मिक वातावरणात ‘सकाळ प्रस्तुत - सुहाना स्वास्थ्यम्’ या उपक्रमाचा शुक्रवारी सायंकाळी प्रारंभ झाला. समाजाच्या समग्र कल्याणाचा उद्देश असणाऱ्या या तीन दिवसीय स्वास्थ्यजागराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पुणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने झाले.