Sakal Tourism Expo 2024 : देशातील पर्यटनस्थळांना भेट देण्याची अनोखी संधी

‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ला आजपासून प्रारंभ
Sakal Tourism Expo 2024
Sakal Tourism Expo 2024sakal

पुणे - देश-परदेशातील पर्यटनस्थळांची मोहिनी नागरिकांवर असते. अनेकांचे प्रवासाचे बेतही होतात. मात्र, ते करताना कोठे, कसे जावे? त्यासाठी कोणती टूर कंपनी निवडावी? असे अनेक प्रश्‍न नागरिकांच्या मनात असतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’चे शुक्रवारपासून (ता. १२) आयोजन केले आहे. देशासह जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटन कंपन्यांकडून नागरिकांना येथे रविवारपर्यंत (ता. १४) घेता येईल.

पर्यटनाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये होणार आहे. तसेच आपल्या आवडीनुसार पर्यटनाचे बेतही ठरविता येतील. देशातील तसेच जगभरातील भ्रमंतीची माहिती देणारा हा एक्स्पो कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्समध्ये सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार आहे.

यासाठी टायटल स्पॉन्सर गिरिकंद ट्रॅव्हल्स असून, पॉवर्ड बाय जॉय एन क्रू व्हेकेशन्स, केसरी टूर्स आहेत. कॅप्टन नीलेश हॉलिडेज, थॉमस कुक इंडिया लिमिटेड, अ हेवन हॉलिडे हे या एक्स्पोसाठी असोसिएट स्पॉन्सर्स आहेत.

काय पाहता येणार?

जागतिक वारसा आणि संस्कृती हेरिटेज ठिकाणे, अद्‌भुत निसर्ग सौंदर्य असलेली स्थळे, जंगल सफारी, आरोग्यविषयक सहल, धार्मिक पर्यटन, जगभरातील भन्नाट समुद्र किनारे, वास्तुकलेचे अनुभव देणारे स्थळे, अप्रतिम पद्धतीने रचना केलेली शहरे आणि मुलांची पसंती असलेले मनोरंजनाचे स्पॉट अनुभवण्याचा सुखद प्रवास या एक्स्पोच्या माध्यमातून सुरू करता येणार आहे.

एक्स्पोमध्ये आज होणारी व्याख्याने

- दु. ३ ते सायं. ४ : रंजन मूर्ती (केनियाची सफर)

- सायं. ४ ते ५ : डॉ. हितेश्‍वरी सोलंकी (स्वास्थ्य आणि पर्यटन)

- सायं. ५ ते ६ : शलाक शाह (युरोप बघताना)

अंदमान’च्या अभिनव प्रकल्पाला पर्यटकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर आणि आमच्यावर दाखविलेल्या विश्‍वासामुळे आम्ही अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहली सुरू केल्या आहेत. या सर्व सहलींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘कॅप्टन नीलेश हॉलिडेज’तर्फे ‘सकाळ ट्रॅव्हल एक्स्पो’च्या माध्यमातून आम्ही आयोजित करत असलेल्या सर्व सहलींवर मोठा डिस्काउंट जाहीर करीत आहोत.

- कॅप्टन नीलेश गायकवाड, संस्थापक-संचालक, कॅप्टन नीलेश हॉलिडेज.

आम्ही गेल्या २० वर्षांत ३२ हजारांपेक्षा अधिक पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळवून दिला आहे. आमच्या कंपनीत नेहमीच ग्राहकांचा विश्‍वास, सेवेचा दर्जा व वाजवी किमतीला महत्त्व दिले जाते. जगभरातील सर्व सहली खिशाला परवडतील, सहलीचा दर्जाही कमी होणार नाही, याकडे आमचा कटाक्ष असतो. आमच्या प्रत्येक ग्राहकाला पर्यटनासाठी कुठे जावे, कधी जावे, कसे जावे, आपल्या सहलीचे बजेट कसे करावे, याबाबत संपूर्ण सल्ला व मार्गदर्शन आम्ही देतो.

- राजेंद्र बुगडे, संचालक, अ हेवन हॉलिडे कंपनी

हे लक्षात ठेवा...

  • कधी : १२, १३ व १४ जानेवारी

  • कुठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

  • केव्हा : सकाळी १० ते रात्री ८

  • सुविधा : पार्किंग व प्रवेश निःशुल्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com