Sakal Vastu Expo 2023 : पुणे शहरात ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला दिमाखात सुरुवात

पुणे शहराच्या विविध भागांतील गृह, व्यावसायिक आणि प्लॉट्सची माहिती एकाच छताखाली देणाऱ्या ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे शनिवारी दिमाखात उद्‌घाटन झाले.
Sakal Vastu Expo 2023
Sakal Vastu Expo 2023sakal
Updated on

औंध - शहराच्या विविध भागांतील गृह, व्यावसायिक आणि प्लॉट्सची माहिती एकाच छताखाली देणाऱ्या ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे शनिवारी दिमाखात उद्‌घाटन झाले. या एक्स्पोला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रविवार (ता. २८) हा प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे.

पुणे शहराचा महत्त्वाचा भाग असलेल्या व वेगाने विकसित होत असलेल्या पश्चिम उपनगरातील बाणेर, बालेवाडी, औंध,पाषाण परिसरासह इतर ठिकाणीही घर खरेदी करण्यासाठी अनेकजण प्राधान्य देत आहेत. या अनुषंगाने बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात समन्वय साधला जावा, यासाठी ‘सकाळ’च्या वतीने बाणेर येथील माऊली गार्डन येथे ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ या गृहप्रकल्पांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्‍घाटन वरद प्रॉपर्टीचे महेश कुंटे, करंदीकर लाईफ स्पेसेसच्या मनाली नातू, रचना स्पेसेसचे यश काळभोर व व्यंकटेश बिल्डकॉनचे अमित मोडगी यांच्या हस्ते शनिवारी झाले. या एक्स्पोमध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स असून त्यामध्ये ग्राहकांना आपल्या निवडीनुसार सदनिका खरेदी करण्यासाठी लागणारी माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

सर्व प्रकारच्या दरातील उपलब्ध असलेल्या सदनिका, मोकळे प्लॉट यांची माहिती घेण्यासह खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पहिल्या दिवसापासूनच गर्दी झाली होती. घर खरेदी करताना निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसनही या प्रदर्शनात होत आहे. कुटुंबाची गरज लक्षात घेता सदनिका, रो-हाऊस,एनए प्लॉट खरेदी करू इच्छिणारांना हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे.

Sakal Vastu Expo 2023
Property Tax : क्लिष्ट प्रक्रियेमुळे मिळकतकराची बिल तयार करण्यासाठी लागतोय विलंब

वास्तू प्रदर्शन

  • कुठे आहे : माउली गार्डन,माउली पेट्रोल पंपाजवळ बाणेर.

  • वेळ : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत

  • सहभाग : २० हून अधिक विकसक सहभागी

  • प्रकल्प संख्या : ४० हून अधिक

  • पार्किंग : विनामूल्य

  • वातानुकूलित हॉल

‘सकाळ’सोबत जोडले गेलो आहोत, हा एक मोठा सन्मान असून कायम, अशा प्रदर्शनात सहभागी असतो. पश्चिम पुण्यातील प्रकल्पास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचा आम्हाला नेहमीच फायदा झाला आहे.

- यश काळभोर, रचना स्पेसेस

मागील वेळेस आम्हाला या प्रदर्शनातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तो अनुभव लक्षात घेता गृहपृकल्पांच्या विक्रीस यावेळेसही नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. पाषाण, मॉडेल कॉलनी आणि कोंढवा येथील आमचे प्रकल्प असून ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत.

- मनाली नातू, सेल्स हेड, करंदीकर लाईफ स्पेसेस

Sakal Vastu Expo 2023
Pune News : विज्ञानातूनच हिंदू विचार सिद्ध होईल - अविनाश धर्माधिकारी

एकाच ठिकाणी अनेक बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प पाहता येतात आणि माहिती घेता येते. त्यामुळे खरेदीसाठी सोयीचे ठरते.

- भास्कर वडजे, पिंपळे सौदागर

‘सकाळ’च्या वास्तू प्रदर्शनात आम्ही सहभागी असतो. आजपर्यंत पुणेकर ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. पूर्व व मध्य पुण्यात आतापर्यंत प्रकल्प केलेले असून आता पश्चिम पुण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा असल्याने घर खरेदीसाठी लोकांचा कल या भागात वाढत आहे. आम्ही त्याप्रमाणे वाकड, बाणेर या भागात गृहप्रकल्प सुरू करत आहोत.

- अमित मोडगी, व्यंकटेश बिल्डकॉन

‘सकाळ’चा वास्तू प्रदर्शनचा हा उपक्रम चांगला असून यातून नवीन लोकांशी जोडले जातो. त्या त्या भागात, असे प्रदर्शन भरवल्याने ग्राहकांनाही सोयीचे ठरते आणि यातून गृहप्रकल्पांच्या विक्रीस चांगला प्रतिसाद मिळतो, ही चांगली बाब आहे.

- महेश कुंटे, वरद प्रॉपर्टीज

या ठिकाणी नवनवीन संकल्पनांचे गृहप्रकल्प असून व्यावसायिक प्रकल्पांचेही वाढते प्रमाण पाहता, असे असणे गरजेचे आहे, तसेच एनए प्लॉट खरेदीसाठीही येथे संधी आहे.

- कौशिक लोडाया, कात्रज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com