Sakal Vidya Education : दहावी, बारावीनंतरचे मार्गदर्शन एकाच छत्राखाली

सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचे सात जूनपासून आयोजन
Sakal Vidya Education Expo
Sakal Vidya Education Exposakal

पुणे - इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांसह पालकांनाही पुढील प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र येत्या काळाच्या दृष्टीने करिअरची दिशा नेमकी काय असावी, दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, अशा अनेक प्रश्नांची यादी पालकांसमोर आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आवश्यक मार्गदर्शन एकाच छत्राखाली मिळावे म्हणून सकाळ माध्यम समूहाने सात ते नऊ जूनदरम्यान कर्वेनगर परिसरातील डीपी रस्ता येथील पंडित फार्म्स येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या एक्स्पोचे ‘पॉवर्ड बाय स्पॉन्सर’ निकमार युनिव्हर्सिटी असून भारती विद्यापीठ, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, डीईएस पुणे युनिव्हर्सिटी आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ‘असोसिएट स्पॉन्सर’ आहेत. मराठवाडा मित्र मंडळ, सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ‘को- स्पॉन्सर्स’ आहेत.

स्टॉलचे बुकिंग कोण करू शकते?

पुण्यासह राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांना या प्रदर्शनात सहभागी होता येईल. प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयापासून कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांसाठी स्टॉलचे बुकिंग करता येईल. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था यात सहभागी होऊ शकतात.

एकाच ठिकाणी सर्व माहिती

महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन यात असणार आहे.

येथे करा स्टॉलचे बुकिंग

या शैक्षणिक प्रदर्शनात तुम्हाला तुमचा स्टॉल असावा, असे वाटतंय ना ! तर मग लवकरात लवकर संपर्क साधा आणि शिक्षण आणि करिअरबाबत मार्गदर्शन, माहिती विद्यार्थी-पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार व्हा.

हे लक्षात ठेवा

  • संपर्क : 9881098448, 9324121811

  • तारीख : ७, ८ आणि ९ जून

  • वेळ : सकाळी १० ते रात्री ८

  • ठिकाण : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com