पुणे - इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्याने आता विद्यार्थी-पालकांना वेध लागले आहेत ते महाविद्यालयीन शिक्षणाचे आणि करिअरची दिशा ठरविण्याचे. मात्र, अशावेळी उत्तम महाविद्यालय निवडण्यासाठी, करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. हेच लक्षात घेऊन सकाळ माध्यम समूहाने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.