नामवंत शैक्षणिक संस्था : मराठवाडा मित्र मंडळ

Marathwada-Mitra-Mandal
Marathwada-Mitra-Mandal

मराठवाडा मित्र मंडळ ही माजी केंद्रीय मंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेली आणि माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाने विस्तारित झालेली पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था आहे. संस्थेतर्फे शालेय ते पदव्युत्तर असे विविध अभ्यासक्रम सक्षमतेने चालविते जातात. संस्थेच्या पुण्यात चार शैक्षणिक शाखा असून, दरवर्षी गुणवत्तेचा आलेख हा उंचावतच आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्वेनगरची निवड ‘सर्वोत्तम महाविद्यालय’ (व्यावसायिक पाठ्यक्रम) म्हणून केली गेली. १० फेब्रुवारी, २०१९ रोजी विद्यापीठाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला. 

नुकताच टाटा टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (टीटीएल), विज्ञान व तंत्रज्ञान पार्क (एसटीपी), पुणे आणि मराठवाडा मित्र मंडळ (एमएमएम), पुणे यांच्या मध्ये सामंजस्य करार झाला. सदर सामंजस्य करारानुसार मराठवाडा मित्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्वेनगर येथे ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इनोव्हेशन अँड इनक्‍युबेशन (सीआयआयआय)’ स्थापन करण्यात आले.

‘सीआयआयआय’ उभारण्याची एकूण किंमत १८ कोटी ५२ लाख रुपये असून, एकूण खर्चापैकी टाटा टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचा हिस्सा १६ कोटी ५२ लाख रुपये व मराठवाडा मित्रमंडळाचा हिस्सा दोन कोटी आहे. काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, तंत्रज्ञानात सातत्याने होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणे सोपे जावे आणि उद्योगजगताची गरज पूर्ण व्हावी, यासाठी या केंद्राची आणि त्यातील अद्ययावत तांत्रिक सुविधांची अभियांत्रिकीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोलाची मदत होणार आहे. ‘नॅक आणि एनबी ए’ या राष्ट्रीय परिषदांकडून संस्थेच्या चार महाविद्यालयांना ’A’ मूल्यांकन मिळालेले आहे. तसेच उर्वरित महाविद्यालयांची ‘नॅक आणि एनबीए’ मूल्यांकन प्रक्रिया चालू आहे. 

डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर येथील आर्किटेक्‍चर आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रूपाने संस्थेचे बीज रुजवले गेले तर कर्वेनगर, लोहगाव व काळेवाडी येथील अभियांत्रिकीच्या रूपाने त्याचा वृक्षरूपी विस्तार झाला. या अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. कॉम्प्युटर, आय.टी., इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल याचबरोबर एम.ई. (कॉम्प्युटर) आणि एम.बी.ए. हे अभ्यासक्रमही यशस्वीरीत्या चालविले जातात. लॉ, जर्नालिझम, इंटेरियर, बी.बी.ए, ज्युनिअर सायन्स या विद्याशाखांची जोड आहेच; याशिवाय फार्मसी, आर्टस्‌ व सायन्स महाविद्यालयातही विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत.  प्रत्येक विभागाने स्वतःचे वैशिष्ट्य निर्माण केले आहे. संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रांत गाजत आहेत.  

‘येथे बहुतांचे हित’ हे संस्थेचे ब्रीदवाक्‍य असून, या ब्रीदवाक्‍यानुसारच संस्था कार्यरत आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, अनाथ व वृद्धांसाठी विशेष सेवा, दरवर्षी वारकऱ्यांना अन्नदान व इतर वस्तूवाटप, अंध व विशेष विद्यार्थ्यांसाठी विविध रूपांत मदत करून संस्था सामाजिकतेचे भान जोपासत आहे. संस्थेने ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदनमधील २०० विद्यार्थ्यांना सलग १२ वर्षे दिवाळीत मामाच्या गावाची सफर, आभाळमाया आणि आपल घर यांसारख्या सामाजिक संस्थांना मदत केलेली आहे. पुरषोत्तम करंडक, क्रिकेट करंडक, बुद्धिबळ तसेच इतर कला व क्रीडा प्रकारांत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपली मोहोर उमटवली आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळेच मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे नाव प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून घेतले जाते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य श्री. भाऊसाहेब जाधव यांना शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी नुकतीच ‘युनिव्हर्सिटी ऑफ साउथ अमेरिकेची’ मानद डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे. 

मागील वर्षापासून संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.  सुवर्ण महोत्सवानिमित्त तीन सेवाभावी संस्थांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा ‘मराठवाडा मित्र मंडळ सेवारत पुरस्कार’ देण्यात आला ही सुवर्णझळाळी व्यवस्थापन, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि अनेक हितचिंतकांमुळे लाभली आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या या संस्थेने विद्यार्थी यश केंद्रित उपक्रम राबविले तसेच भविष्यातही राबवीत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com