स्टडी ॲब्रॉड ऑनलाइन समिटचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

स्टडी ॲब्रॉड ऑनलाइन समिट 
कधी - शनिवार (ता. २०) ते मंगळवार (ता. २३) 
रजिस्ट्रेशन - विनामूल्य 
रजिस्ट्रेशन - www.vidyasakal.com 
ग्रुप - https://www.facebook.com/groups/SakalVidya

काय माहिती मिळणार? 
परदेशातील स्कॉलरशिप कुठल्या आहेत. अमेरिका, युरोप, रशिया, आशिया इथे कुठली विद्यापीठे आहेत. जाण्यासाठी किती खर्च येतो? तिथे जाण्यासाठी काही स्कॉलरशिप आहेत का? याविषयी या क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. 

पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून, फेसबुक लाइव्हद्वारे प्रश्‍नही विचारता येणार आहेत. 

परदेशातील शिक्षणाच्या विविध संधी, तेथील प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करणारे हे ऑनलाइन समिट आहे. यामध्ये परदेशातील विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म पोर्टलवर आहे. रजिस्ट्रेशन केलेल्यांना व्हिडिओ अपलोड झाले की मेल येतील. 

फेसबुक ग्रुपमध्ये इन्व्हाइट केले जाईल. महत्त्वाचे म्हणजे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार ते बघता येतील.

परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबद्दल माहिती नसलेल्या खासकरुन भारतीय पालक व विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी ॲबॉर्ड‘ डिजिटल माध्यमातून पोहोचविण्याचा  पुढाकार घेऊन उपक्रम  राबविल्यामुळे मी सकाळ चे अभिनंदन करतो. रशियाच्या इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा देऊन प्रशिक्षण देत आहे.
- डॉ. अमित कामले, M.D (Russia) संचालक ए. के. एज्युकेशनल कॉन्सुलटंट्‌स

डॉ. अमित कामले हे ‘ए.के.एज्युकेशनल कन्सल्टंट्‌स’ चे डायरेक्‍टर आहेत. त्यांनी वोलगोग्रॅड  मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेतले आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ तसेच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड सायन्स रशियन फेडरेशनचे युनिव्हर्सिटीचे ते प्रतिनिधित्व करतात. ही कंपनी रशियन सरकार सोबत  १९ वर्षापासून संलग्न आहेत. तब्बल १२०० हुन अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश मिळवून दिला आहे व ३५० पेक्षा अधिक अधिक विद्यार्थी भारतात यशस्वीरीत्या व्यवसाय करीत आहेत. कझान, मॉस्को, निझनी नोव्हगोरॉड, फेडरल युनिव्हर्सिटी (सेंट्रल गव्हर्नमेंट) अशा १२ विद्यापीठांचे ते अधिकृत प्रतिनिधी आहेत. तब्बल  ३८ राष्ट्रांमध्ये त्यांनी जागतिक विद्यापीठांमध्ये जसे की ऑक्‍सफर्ड, केंब्रिज, मॅंचेस्टर (यु.के.), स्टॅनफोर्ड, येल (यु.एस.ए), मेलबर्न, सिडनी, डीकन  (ऑस्ट्रेलिया), तेल अवीव युनिव्हर्सिटी (इस्राईल) सारख्या विद्यापीठामध्ये त्यांनी भेट दिली आहे.

माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभा पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रवेश, त्यांचे मनोबल खंबीर करण्यासाठी व असाधारण सामाजिक कार्यासाठी सत्कार केला आहे. बेस्ट एज्युकेशनल कन्सल्टंट इन इंडियाचे पुरस्कार तसेच इतर अनेक पुरस्कारांने त्यांना सन्मानीत करण्यात आलेले आहे.

सकाळ विद्या च्या चर्चासत्र वर अमेरिका व जर्मन शिक्षणाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. हा सत्र मध्यमवर्गीय व गावात राहणारे विद्यार्थी व पालक यांच्या साठी उपयुक्त ठरेल. आर्थिक परिस्थिती चांगली नसेल पण अभ्यासकार्याची इच्छाशक्ती असेल त्यांना अमेरिकेत किंवा जर्मनी मध्ये मोफत शिक्षण घेता येणार आहे.
- डॉ. तुषार विनोद देवरस, अध्यक्ष, ॲस्टूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी

डॉ. तुषार विनोद देवरस,भारतातील प्रमुख करिअर सल्लागारांपैकी एक आहेत. त्यांचे अमेरिकेत कार्यालय आहेत. डॉ. डोनाल्ड मार्टिन, माजी डीन, कोलंबिया विद्यापीठ हे यूएसए मधल्या ऑफिसचे विभागणी प्रमुख आहेत व ३२ वर्षा पासून मार्गदर्शन करतात. पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, निधी, जिवंत, व्हिसा बद्दल तपशीलवार माहिती मिळेल. विद्यार्थ्यांना अमेरिकेत प्रचंड शिष्यवृत्ती मिळत आहे.

विद्यार्थ्यांना एसएटी, ॲक्‍ट, एसएटी-सबजेक्‍ट आणि एपी परीक्षांबद्दल माहिती मिळेल. दुस-या सत्रात, विनामूल्य जर्मन शिक्षणाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. डॉ. तुषार विनोद देवरस माजी वैज्ञानिक भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र, गेल्या २५ वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करिअर काउन्सिलिंग करत आहेत, शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकते विरुद्ध देणगी विरोधी मोहीम राबवत आहेत. कमी गुण असूनही सर्व शाखांमध्ये मेरिटच्या गुणाआधारे प्रवेश मिळवून देण्यात तज्ञ, आमचे प्रतिनिधी USA, Germany आणि Philippines सहित अन्य १७ देशामध्ये कार्यान्वित आहेत.

विश्व एज्युकेशनल कन्सल्टंट गेल्या २० वर्षापासून विद्यार्थ्यांना परदेशात पाठवत आहे. २० वर्षामध्ये आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना परदेशात MBBS शिक्षणासाठी पाठविले आहे. काही विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रामध्ये विविध अधिकारी म्हणून काम करत आहेत.  काही विद्यार्थ्यांनी भारतामध्ये स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले आहे. विश्वचे संस्थापक ज्ञानेश्वर भस्मे व प्रमोद कमलाकर, प्रथमेश भस्मे, प्रशांत कमलाकर, प्रसाद कमलाकर सर्वच एकाच कुटुंबातील असून सर्वजण पूर्ण क्षमतेने हाच व्यवसाय अत्यंत जबाबदारीने पार पाडत आहेत. त्यामुळे ही संस्था कोणा एका व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून नसून सर्व व्यक्तींच्या खादंयावर सर्व मुलांची जबाबदारी आहे. महाराष्ट्रामध्ये व भारतामध्ये हजारो consultancy परदेशात पाठवण्याचे काम करत आहेत. त्यांचा एकच मालक अथवा एकच जबाबदार व्यक्ती असतो. एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती १००% तुमच्यासोबत अगदी मुलांचे शिक्षण  पूर्ण होईपर्यंत असतात त्याचबरोबर विश्वच्या ५ व्यक्तींना admission, visa, procedure, immigration rules & regulation याचा आलेला अनुभव एकूण  २०वर्षापासून पाठीशी असल्यामुळे तुमच्या मुलाला व तुम्हाला नेहमीच उपयोगी पडेल. विश्वमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जास्तीत जास्त १०% विद्यार्थी mouth publicity तून येत आहेत व १०% जाहिरातील मधून येत आहेत. आपल्यासारख्या मान्यवर पालक व विद्यार्थ्यांमुळे विश्व महाराष्ट्रात नं. १ झालेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vidya study abroad Online Summit