The proposal gained attention after the issue was raised in the Legislative Council following a report published by Sakal.
Sakal
प्रज्वल रामटेके,
पुणे : ‘पोलिस भरतीसह राज्यातील सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी राज्य सरकार सकारात्मक असून, या भरती प्रक्रियेसाठी वार्षिक वेळापत्रक तयार करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही सुरू करण्यात येईल,’ असे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिले. पोलिस भरतीसह राज्यातील सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल विधानपरिषदेत घेण्यात आली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर गृहराज्यमंत्री कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.