पुणे - ‘सकाळ प्रकाशन’ आणि प्रकाश पवार लिखित ‘सकलजनवादी छत्रपती शिवराय’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. ८) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे, अर्थशास्त्र संशोधक-अभ्यासक अभय टिळक यावेळी उपस्थित राहणार आहेत.