नागठाणे पारितोषिक वितरण
सकस वाचन करणे ही काळाची गरज
डॉ. संदीप श्रोत्री; धावडशीच्या हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
शेंद्रे, ता. ४ : सध्याच्या माहितीच्या युगात केवळ माहिती मिळवणे पुरेसे नाही, तर ती पचवण्यासाठी आणि विवेकबुद्धी जागृत ठेवण्यासाठी सकस वाचन करणे काळाची गरज आहे, असे मत आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे संस्थापक डॉ. संदीप श्रोत्री यांनी व्यक्त केले.
धावडशी (ता. सातारा) येथील श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूलमध्ये समूहातर्फे आयोजित निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी समूहाचे समन्वयक श्रीराम नानल, सविता कारंजकर आदी उपस्थित होते.
पुस्तके ही केवळ कागदाची पाने नसून ती ज्ञानाची दारे आहेत. टीव्ही आणि मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होत आहे. अशा वेळी दर्जेदार साहित्याचे वाचन केल्यामुळे विचारांची प्रगल्भता वाढते आणि व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत होते, असेही डॉ. श्रोत्री यांनी सांगितले.
श्रीराम नानल यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आणि कल्पकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सविता कारंजकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता विद्यार्थी श्रीराज पवार या स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन गौरविण्यात आले. ‘राष्ट्रीय मिन्स कम मेरिट’ परीक्षेत यशस्वी झालेल्या शाळेतील २१ गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी प्रास्ताविक केले. पूनम डोईफोडे यांनी सूत्रसंचालन केले. काका कांबळे यांनी आभार मानले. माधवी दीक्षित, शंकर कोरे, प्रफुल्लता बकरे, वैभव पाटील अजितकुमार पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
----------------------
08233
धावडशी : पारितोषिक प्रदान करताना डॉ. संदीप श्रोत्री, श्रीराम नानल आदी.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

