

Sugar Commissioner's Directive on Cooperative Factory Membership
Sakal
मंचर : सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ऊस पुरवठ्याच्या आधारावर कारखान्याचे सभासदत्व देता येणार नाही, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २२ मधील तरतुदीनुसार सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.